एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर आता राजकीय पक्षांची हॉटेलवारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २३ नोव्हेंबरला निकाल येणार असून मुंबईसह इतर ठिकाणाची हॉटेल बुक होण्याची शक्यता आहे. खबरदारी म्हणून सर्व राजकीय पक्षांकडून आपल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.
काल राज्यात एकाच टप्यात मतदान पार पडले असून आता निकालाकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे. एक्झिट पोलनुसार, महायुती मविआपेक्षा वरचढ असताना दिसत आहे. तत्पूर्वी, सर्व राजकीय पक्षांकडून आपल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची शक्यात वर्तवली जात आहे.
मागील सरकार स्थापनेच्या काळात पक्षांकडून मोठ्या प्रमाणात उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते. यावेळी देखील स्वतःच्या पक्षाचे उमेदवार किंवा अपक्ष उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. कारण, जे सेफ आमदार आहेत त्यांना एकाच ठिकाणी ठेवून पक्षाला सरकार स्थापनेचा दावा करता येवू शकतो. त्यामुळे आपआपल्या आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी आज किंवा उद्या हॉटेलची बुकिंग होवू शकते, अशी माहिती समोर येत आहे.