भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन आज (१२ जानेवारी) शिर्डीत पार पडले. या समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रींय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडेसह आदी मंत्री, नेते उपस्थित होते. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाषणाला सुरुवात केली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी व्हायचे असल्याचे गृहमंत्री शाह यांनी म्हटले. आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच राष्ट्रवादी शरद पवार आणि उबाठाचे उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच महाराष्ट्राच्या विजयाचे अनेक अर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.
गृहमंत्री अमित शाह म्हणाले, महाराष्ट्राच्या विजयाने १९७८ ला शरद पवारांनी सुरु केलेले दगा फटक्याचे राजकारण २० फुट जमिनीत गाडण्याचे काम जनतेने केले. उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत जी बंडखोरी केली, २०१९ ला विचारधारा सोडली, बाळासाहेबांचे सिद्धांत सोडले होते, फसवणूक-खोटे बोलून मुख्यमंत्री बनले होते त्यांना जनतेने त्यांची जागा दाखविली.
१९७८ पासून २०२४ पर्यंत महाराष्ट्र अस्थिरतेचा शिकार राहिला, या अस्थिरतेची रात्र संपवून महाराष्ट्राला स्थिर रस्त्यावर चालवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला जिंकून दिले. लोकसभेनंतर पुढे विजय आपलाच होईल अशी आशा लावून बसलेल्या विरोधकांच्या स्वप्नांचा चकनाचूर जनतेने केला. या महाविजायाचे शिल्पकार आमचे कार्यकर्ते आहेत, यासाठी महाराष्ट्राच्या जनतेचे, लाडक्या बहिणींचे आणि माझ्या शेतकऱ्यांचेही आभार.
ते पुढे म्हणाले, एक चित्र मी बघितले होते, ज्यामध्ये शरद पवारांच्या पाठीमागे एका मोठा नकाशा होता. त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मुंबई हे सर्व क्षेत्र दिसत होते आणि शरद पवार पत्रकारांना सांगत होते की, कोठे काय होणार. आता मी शरद पवारांना सांगतो काय काय झाले ते, उत्तर महाराष्ट्र मधून २२ पैकी २१ जागा आम्ही जिंकलो. कोकणात १७ पैकी १६ जागा, पश्चिम महाराष्ट्रात २६ पैकी २४, पश्चिम विदर्भामधून १७ पैकी १५, पूर्व विदर्भामधून २९ पैकी २२, मराठवाड्यात २० पैकी १९ आणि मुंबईत १७ पैकी १५ जागांवर विजय मिळाला.
हे ही वाचा :
मुख्यमंत्री योगींचा शिरच्छेद करण्याची धमकी देणाऱ्या मेहजान उर्फ़ फैज़ला अटक!
प्रयागराजचा महाकुंभ: भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा एक उत्साही संगम!
राखेच्या टिप्परने घेतला सरपंचाचा बळी !
‘मेयो’ व ‘मेडिकल’मधील अद्ययावतीकरण गुणवत्तापूर्ण करावे
एकनाथ शिंदेंचीच खरी शिवसेना आणि अजित पवारांचीच खरी राष्ट्रवादी आहे हे स्पष्ट झाले आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना घरी बसवण्याचे काम जनतेने केले आहे. मोदींच्या विकासाच्या राजनीतीवर आणि सनातन संस्कृती आणि हिंदुत्वला मानत महाराष्ट्राच्या जनतेने शिक्कामोर्तब केले आहे.
भाजपाला २०२४ चे वर्ष महत्वाचे ठरल्याचे गृहमंत्री शाह यांनी म्हटले. ते म्हणाले, याच काळात नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले, हरीयामध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपाचे सरकार स्थापन झाले, आंध्र प्रदेशात पहिल्यांदा एनडीए आघाडी बनली. ओडीशामध्ये पूर्ण बहुमताने सरकारने स्थापन झाले, सिक्कीममधेही तिसऱ्यांदा विजय मिळाला आणि महाराष्ट्रामधेही तिसऱ्यांदा जनादेश मिळाला. भाजपाचा इतिहास लिहीला जाईल तेव्हा २०२४ हे वर्ष महत्वपूर्ण असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजी नगरसह महापालिकेच्या, नगर परिषदेच्या आणि जिल्हा पंचायतीच्या निवडणुका येत आहेत. त्यामुळे विरोधकांना एकाही जागेवर बसता येणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. जेव्हा पंचायत पासून संसदेपर्यंत भगवा फडकवला जातो तेव्हाच विकासाची साखळी पूर्ण होते, असे गृहमंत्री शाह यांनी म्हटले.
सेनापती बापट यांचा कवितेच्या काही ओळी आहेत त्या म्हणजे, महाराष्ट्रा विना राष्ट्र गाडा चालणार नाही, महाराष्ट्राच्या विकासा शिवाय देशाचा विकास असंभव आहे. तुमच्या विजयामुळे इंडी आघाडीचा आत्मविश्वास समाप्त झाला आहे. ८ तारखेला फटाके तयार ठेवा कारण दिल्लीमध्ये भाजपाचे सरकार बनणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
२०२४ च्या शेवटचे काम भाजपा महाराष्ट्राने केले आणि २०२५ च्या विजयाची सुरुवात दिल्ली भाजपा करणार आहे हे निश्चित आहे. विकसित महाराष्ट्रा शिवाय विकसित भारत बनू शकत नाही. कारण विकासाचे नेतृत्व मुंबई आणि महाराष्ट्राने केले आहे, असे गृहमंत्री शाह यांनी सांगितले.