इस्त्रोप्रमुख सोमनाथ यांना कर्करोगाची लागण

इस्त्रोप्रमुख सोमनाथ यांना कर्करोगाची लागण

इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. सोमनाथ यांनी तारमक मिडिया हौसला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना कॅन्सर झाला असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चांद्रयान-३ मोहिमेच्या प्रक्षेपणावेळी त्यांना काही आरोग्याच्या समस्या होत्या. मात्र तेंव्हा हा प्रकार स्पष्ट झाला नव्हता. आदित्य-एल१ मिशन लाँच झाले त्याच दिवशी त्यांच्या कॅन्सरचे निदान झाले होते. हे निदान झाल्यानंतर केवळ त्यांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबियांना आणि सहकाऱ्याना मोठा धक्का बसला होता, असेही सोमनाथ यांनी या मुलाखतीत सांगितले.

२ सप्टेंबर २०२३ रोजी भारतातील पहिली अंतराळ-आधारित सौर वेधशाळा आदित्य एल १, सूर्याचा अभ्यास करण्यासाठी प्रवासाला निघाले होते त्यावेळी सोमनाथ यांचे नियमित स्कॅन करण्यात आले होते. तेव्हा गाठ आढळून आली. या अनपेक्षित निदानामुळे त्यांना पुढील स्कॅन्ससाठी चेन्नईला नेण्यात आले. सोमनाथ यांच्यावर केमोथेरेपिनंतर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याबद्दल बोलताना सोमनाथ म्हणाले, कुटुंबासाठी हा मोठा धक्का होता. पण आता मला कॅन्सर आणि त्यावरचा उपचार हा एक उपाय समजतो.

हेही वाचा..

तापस रॉय यांचा टीएमसी आमदारकीचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची शक्यता!

भाजपाचे नेते म्हणतात आम्ही ‘मोदी का परिवार’

केजरीवाल सरकारचा ‘फुकट’चा अर्थसंकल्प, १८ वर्षांवरील सर्व महिलांना दरमहा १००० रु.

बेपत्ता खलाशाच्या वडिलांचे पंतप्रधान मोदींना साकडे!

आपण पूर्ण बारा होण्याबद्दल थोडासा अनिश्चित होतो. कारण या सगळ्या प्रक्रियेतून मी जात होतो, असे सांगून त्यांनी आपल्या कर्करोगाविरोधात कशा पद्धतीने लढाई केली त्याचे स्वरूप त्यांनी अधोरेखित केले. केवळ चार दिवस रुग्णालयात घालवल्यानंतर त्यांनी पाचव्या दिवसापासून कोणतीही कुरकुर न करता इस्त्रोमध्ये आपली जी कर्तव्ये आहेत, त्याच्या कामाला सुरुवात केली. या संदर्भात आपली नियमित चाचणी होत आहे. तपासणी करण्यात येत आहे. आता आपण पूर्णपणे बरे झालो आहोत. माझी कर्तव्ये मी पुन्हा सुरु केली असल्याचे सोमनाथ म्हणाले.

Exit mobile version