रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या भारतीय लोकतांत्रिक नेतृत्व संस्थान (आयआयडीएल) द्वारे पहिल्या ‘मॉडेल पार्लमेंट’ अर्थात युवा संसदेचे आयोजन करण्यात आले होते. मध्यप्रदेश विधानसभेचे आमदार देवेंद्र वर्मा या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. या मॉडेल संसदेत आयआयडीएल च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा केली.
१९ आणि २० फेब्रुवारी रोजी उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सभागृहाला संसदेचे स्वरूप आले होते. निमित्त होते आयआयडीएल आयोजित युवा संसदेचे. या युवा संसदेत विधेयक मांडणे, विधेयकावर चर्चा, शून्य प्रहर, प्रश्नोत्तरांचा प्रहर, अशा संसदेतल्या कामकाजाच्या अनेक गोष्टी विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आल्या. ओटीटी नियमन आणि आरक्षण अशा दोन विधेयकांवर चर्चा झाली. शून्य प्रहरात गंगा स्वच्छता, तिबेटचे स्वातंत्र्य आणि डेटा सुरक्षा अशा अनेक जनहिताच्या विषयांवर चर्चा झाली. ध्यानाकर्षण प्रस्तावात खलिस्तानी आंदोलन, ऑर्गन ट्रान्सप्लांट, शस्त्र अधिकार या विषयांवर चर्चा झाली.
हे ही वाचा:
या युवा संसदेचा समारोप सत्ता पक्षाकडून अर्थसंकल्पाची मांडणी करून झाला. मध्य प्रदेशचे आमदार देवेंद्र वर्मा यांनी या युवा संसदेचे अध्यक्ष म्हणून काम पहिले. या युवा संसदेच्या समारोपात देवेंद्र वर्मा यांनी आयआयडीएलच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.