23 C
Mumbai
Saturday, November 30, 2024
घरविशेषकेजरीवाल यांनी न्यायालयात घेतले अतिशी मार्लेना यांचे नाव

केजरीवाल यांनी न्यायालयात घेतले अतिशी मार्लेना यांचे नाव

Google News Follow

Related

अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली दारू धोरण घोटाळ्यात मंत्री आतिशी मार्लेना यांचे नाव घेतल्याने त्यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. यातील वादग्रस्त मध्यस्ती विजय नायरने अतिशी मार्लेना यांच्याशी चर्चा केली होती माझ्याशी केली नव्हती, असे त्यांनी सांगितले आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली दारू धोरण घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांचे वर्तन पूर्णतः असहकाराचे आहे.त्यांनी चौकशीत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. केजरीवाल हे त्यांच्या फोनचा पासवर्ड शेअर करत नाहीत, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी न्यायालयात सांगितले आहे.

दिल्ली न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) युक्तिवाद ग्राह्य धरला असून दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केजरीवाल यांच्या ‘असहकार’ वर्तनाचा दाखला देत पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली होती. सोमवारी कोठडीची मुदत संपल्याने मुख्यमंत्र्यांना राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च २०२४ रोजी दारू घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. केजरीवाल यांना न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा त्यांनी प्रधानमंत्री जी जो ये कर रहे हैं वो देश के लिए अच्छा नहीं हैं, असे म्हटले होते.

हे ही वाचा:

ओवैसींना आला मुख्तार अन्सारीचा उमाळा

‘तेल्याचा मुलगा मंदिराचे उद्घाटन कसे करू शकतो?’

गेल्या १० वर्षांत जे काही घडले ते केवळ ट्रेलर!

दिल्लीत इंडिया आघाडीसोबत आणि बंगालमध्ये ममता म्हणतात, काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत

२०२२ मध्ये केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने दिल्ली अबकारी धोरण २०२१-२२ प्रकरणात विजय नायर या आरोपीला अटक केली. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे निकटवर्तीय विजय नायर, दिल्ली दारू घोटाळ्याच्या संदर्भात मनीष सिसोदिया आणि अन्य आप नेत्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांसंदर्भात सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये ज्या १५ जणांची नावे आहेत त्यापैकी एक होता. सीबीआयने दारू घोटाळ्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की नायर “२०२१-२२ या वर्षासाठी दिल्लीच्या जीएनसीटीडी च्या उत्पादन शुल्क धोरणाची आखणी आणि अंमलबजावणीमध्ये अनियमितता करण्यात सक्रियपणे सहभागी होता.

विजय नायर हे ओन्ली मच लाउडर (ओएमएल) नावाच्या मुंबईस्थित मनोरंजन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) होते. २०२० च्या दिल्ली राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनी आम आदमी पार्टीचे ‘अंशकालीन स्वयंसेवक’ म्हणून काम केले. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षासोबतच्या कार्यकाळात त्यांनी पक्षाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आणि सोशल मीडिया हँडल व्यवस्थापित करण्यात मदत केली.आप आमदार आतिशी मार्लेना यांनी कॅरव्हानला सांगितले की नायर हे ‘ॲड-हॉक कार्यकर्ता’ होते, हा दावा पक्षाचे राष्ट्रीय परिषद सदस्य अंकित लाल यांनी नाकारला. त्यांनी निदर्शनास आणले की माजी ओएमएल सीईओ ५-६ वर्षांपासून आपशी संबंधित आहेत. लाल यांनी सांगितले की, डिजिटल मोहिमेची रणनीती आखण्यासाठी नायर हे त्यांच्याकडे जाणारे व्यक्ती आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
202,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा