हिंदूविरोधी प्रतिमा बदलण्यासाठी ममतांकडून रामनवमीला सार्वजनिक सुट्टी

हिंदूविरोधी प्रतिमा बदलण्यासाठी ममतांकडून रामनवमीला सार्वजनिक सुट्टी

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल सरकारने राम नवमीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यावर आता भारतीय जनता पक्षाचे आयटी सेलेचे प्रमुख अमित मालवीय यांनी यावर निशाणा साधला आहे. ममता बनर्जी यांनी त्यांची हिंदू विरोधी प्रतिमा बदलण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आता त्यांना रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक होणार नाही याची त्यांना काळजी घेतली पाहिजे, असे त्यांनी समाज माध्यमात पोस्ट केलेल्या मजकुरात म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांना गेल्या काही वर्षांपासून ‘जय श्री राम’च्या घोषणांमुळे समस्या निर्माण झाल्या आहेत. मे २०१९ मध्ये ‘जय श्री राम’ ची नारे ऐकून त्यांनी पोलिसांना नारे देणाऱ्याना अटक करण्यास सांगितले होते. उत्तर २४ परगणा परिसरात भेट दिली तेव्हा तिथे काही लोकांनी जय श्री राम चा नारा दिला होता ते ऐकताच ममता बनर्जी गाडीतून उतरल्या आणि संबंधित लोकांवर ओरडायला लागल्या होत्या. त्यांच्यावर कारवाई करण्याची धमकी सुद्धा त्यांनी दिली होती.

हेही वाचा..

लग्नासाठी मुलगी पाहायला गेलेल्या कुटुंबावर काळाचा घात, कार अपघातात सहा जणांचा मृत्यू!

इयत्ता दुसरीतल्या मुलाला हृदयविकाराचा झटका?

मनी लाँड्रिंग प्रकरणी छापा टाकत लालू यादव यांच्या निकटवर्तीयाला अटक!

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल!

जानेवारी २०२१ मध्ये एका कार्यक्रमात बोलण्यासाठी त्यांना आमंत्रित केल्यावर जमलेल्या लोकांनी ‘जय श्री राम’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या. ममतांना ते सहन झाले नाही आणि स्टेजवरून त्या निघून गेल्या. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, लोकांना आमंत्रित करणे आणि नंतर त्यांचा अनादर करणे हे सरकारला शोभणारे नाही. हा सरकारी कार्यक्रम आहे, राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही. ऑक्टोबर २०२१ मध्ये ममता बॅनर्जी मतदानासाठी गोव्यात प्रचारासाठी गेल्या जेथे त्यांचे स्वागत ‘जय श्री राम’ घोषणा आणि पोस्टर्सने करण्यात आले. या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि टीएमसी नेते लुइझिन्हो फालेरियो यांनी भाजपवर घोषणाबाजी केल्याचा आरोप केला होता. मात्र, भाजपने या घटनेत सहभाग असल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे.

एप्रिल २०२३ मध्ये बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम समुदायाला राज्यातील दंगलखोर संपवण्यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्याचे आवाहन केले. आपल्या भाषणादरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी रामनवमी मिरवणुकीत सहभागी झालेल्या हिंदू भाविकांवर घातक शस्त्रे बाळगल्याबद्दल निंदा केली होती. हिंदूंनी परवानगीशिवाय रामनवमीच्या मिरवणुका काढल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आणि पाच दिवस मिरवणूक का काढायची असा सवाल केला होता. ‘मिरवणुकीत बंदुका घेऊन जाऊ नका, मिरवणुकीत बॉम्ब घेऊन जाऊ नका’, हिंदू भाविकांनी बंदुका आणि बॉम्ब बाळगल्याचा आरोप त्यांनी केला होता.

Exit mobile version