‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी झालेल्या वाहनांचे पैसे काँग्रेसने थकवले

‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी झालेल्या वाहनांचे पैसे काँग्रेसने थकवले

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात नुकतीच काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ पार पडली. मणिपूरहून निघालेली ही यात्रा मुंबई संपली. सुमारे ६ हजार ६०० किलोमीटरची ही पदयात्रा होती. भारत जोडो यात्रेचा हा पुढचा टप्पा होता. काँग्रेसच्या नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांचा या यात्रेत सहभाग होता शिवाय सामानासाठी आणि माणसांसाठी अनेक भाडेतत्त्वावरची वाहने यात सहभागी होती. अशातच आता याबद्दल नवी माहिती समोर आली आहे.

काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी झालेल्या वाहनांचे पैसे न दिल्याचा आरोप आता करण्यात येत आहे. दिल्लीमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणाऱ्या काही लोकांनी वाहने वापरूनही पैसे न मिळल्याचं म्हटलं आहे. भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी असलेल्या २५ हून अधिक वाहनांचे पैसे न दिल्याचा आरोप बुलंदशहरच्या अनुपशहर कोतवाली भागातील रोरा गावातील रहिवासी मोती, सतेंद्र, धर्मेंद्र आणि रामकिशन यांनी केला आहे.

हे ही वाचा:

यूपी पोलीस पेपर लीक प्रकरणातील मास्टरमाईंड ताब्यात!

दिल्ली जल मंडळ घोटाळ्यातील लाचेची रक्कम ‘आप’च्या निवडणूक निधीसाठी!

एक काळ असा होता जेव्हा नेहरू म्हणाले होते ‘भारत दुसरा, चीन पहिला’

“संजय राऊतांनी स्वतःची शिवसेना संपवून राष्ट्रवादी संपवली आता काँग्रेसही संपवतायत”

भारत जोडो न्याय यात्रेतील संबंधित लोकांना अनेक वेळा विनंती करून देखील वाहनांचे पूर्ण पैसे मिळाले नसल्याची तक्रार या लोकांनी केली आहे. वाहनांच्या भाड्याचे पैसे लवकरात लवकर देण्याची मागणी या वाहन मालकांनी केली आहे. राहुल गांधी यांनी काढलेल्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’त आमच्या कंटेनर वाहनांचा समावेश होता मात्र, या वाहनांचे लाखो रुपयांचे भाडे अद्याप बाकी आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. काँग्रेस पक्षाने यापूर्वी गेल्या वर्षी काढलेल्या यात्रेतील वाहनांची थकबाकीही अद्याप दिली नसल्याचंही सांगण्यात येत आहे.

Exit mobile version