‘भारत सरकारने परवानगी न दिल्यास सन २०२५मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीकरिता आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यासाठी आयसीसी बीसीसीआयवर दबाव आणणार नाही,’ असे आयसीसीआयने स्पष्ट केले आहे. तसेच, यासाठी अन्य पर्यायांचा, त्यात प्रामुख्याने ही स्पर्धा दोन देशांत खेळवण्याचा विचार केला जाईल, असे आयसीसीआय मंडळाच्या सदस्याने स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षीची आशिया चषक स्पर्धा हीदेखील अशा पद्धतीने खेळवली गेली होती. तेव्हादेखील भारताने या स्पर्धेचे मूळ यजमान पाकिस्तानमध्ये प्रवास केला नव्हता. भारताचे सर्व गट सामने आणि अंतिम सामने श्रीलंकेत खेळले गेले तर, उर्वरित सामने श्रीलंकेत झाले. चॅम्पियन्स ट्रॉफीला अजून बरेच दिवस शिल्लक असले तरी दुसरे संभाव्य ठिकाण म्हणून यूएईचा वापर करण्याची कल्पना पूर्णपणे नाकारता येणार नाही, असे सांगितले जात आहे.
यूएईमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी फेब्रुवारी आणि मार्च हे दोन आदर्श महिने असल्याने आणि तेथील तीन आंतरराष्ट्रीय स्टेडियम वापरासाठी सज्ज असल्याने भारताला पाकिस्तानमध्ये जाण्याची इच्छा नसल्यास या देशात सामने खेळवले जाऊ शकतात. या स्पर्धेत आठ संघ दोन गटांत विभागले जाण्याची अपेक्षा आहे आणि भारताचे गट सामने दुबई, अबुधाबी आणि शारजा येथे होऊ शकतात.
बीसीसीआय याबाबतचा निर्णय केवळ स्पर्धेच्या आधीच घेईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य ठिकाण म्हणून यूएईचा वापर करण्याची कल्पना पूर्णपणे नाकारली जाऊ शकत नाही.
‘प्रत्येक सदस्य मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा केली जाईल आणि नंतर त्यावर मतदान घेतले जाईल. परंतु जर भारत सरकारने स्पष्टपणे सांगितले की, ते तेथे खेळू शकत नाहीत, तर आयसीसीला पर्याय शोधण्याची गरज आहे,’ असे मंडळाच्या एका सदस्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.
‘आयसीसी बोर्डाच्या सदस्यदेशांनी स्वतःच्या सरकारने जारी केलेल्या कोणत्याही धोरण/सूचनांच्या विरोधात जावे, असे मंडळ कधीही अपेक्षा करत नाही,’ असे या सदस्याने स्पष्ट केले.
भारत आणि पाकिस्तानचे द्विपक्षीय क्रिकेट संबंध सन २००८पासून तोडले गेले आहेत. सन २०१२ मध्ये पाकिस्तानने कसोटी मालिकेसाठी भारतात प्रवास केला असला तरी, भारताने जवळपास दीड दशकात पाकिस्तानला भेट दिलेली नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे, सन २०११ची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा, २०१६ची टी-२० विश्वचषक आणि गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान पाकिस्तानने भारतात प्रवास केला होता. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या सर्व संघांनी अलीकडच्या काळात पाकिस्तानला भेट दिली आहे.
हेही वाचा :
कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अडचणीत आलेल्या अरविंद केजरीवालांना अटकपूर्व जामीन
‘माझ्या प्रिय कुटुंबातील सदस्य’ म्हणत नरेंद्र मोदींनी १४० कोटी भारतीयांना उद्देशून लिहिलं पत्र
१०० कोटींची लाच; १० पेक्षा अधिक मोबाइल बदलले
मविआने पडणाऱ्या जागा दिल्या; वंचितची तक्रार
मुत्सद्देगिरी चालेल का?
जानेवारी-फेब्रुवारीमध्ये, भारतीय डेव्हिस चषक संघ त्याच्या जागतिक स्पर्धेसाठी इस्लामाबादमध्ये होता. तेव्हा भारतीय खेळाडू तसेच सहाय्यक कर्मचाऱ्यांनी तेथील सुरक्षा व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले होते. तथापि, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांसारख्या सुपरस्टार असलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा विचार केला तर तो खूप धोकादायक ठरू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. ‘गेल्या वर्षी पाकिस्तान सरकारने त्यांच्या संघाला भारतात झालेल्या विश्वचषकात खेळण्याची परवानगी दिली, त्या दृष्टिकोनातून बीसीसीआयला याकडे पाहणे साहजिकच भाग पडेल. तसेच, ही जागतिक स्पर्धा असल्याने भारत सरकार मवाळ भूमिका घेऊ शकते. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि व्हीपी राजीव शुक्ला आशिया कप दरम्यान पाकिस्तानला गेले होते,’ याची आठवण या सदस्याने करून दिली.