शिवसेना आता स्वतःला एक राष्ट्रीय पक्ष म्हणून सिद्ध करायची तयारी करत आहे. उत्तरप्रदेश निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे तरुण नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तरप्रदेश मध्ये सभा घेतली. आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेना एक नवीन नेतृत्व म्हणून बघत आहे तसेच काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणाऱ्या के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीला आदित्य ठाकरे यांचे बंधू तेजस ठाकरे गेले होते आणि त्यांच्यात चर्चा झाली. शिवसेना या दोघांना नवीन नेतृत्वाच्या दृष्टिकोनातून तयार करत आहेत पण खरंच चेहरे बदलून भविष्य बदलणार का?