मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एक आरोपी तहव्वूर राणा याने भारतात होणारे हस्तांतरण रोखण्यासाठी केलेली आणखी एक याचिका अमेरीकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. २०१२ मध्ये २६/११ हल्लाप्रकरणातील एक आरोपी अबु जुंदाल उर्फ अबु हमजा उर्फ सैयद जबीउद्दीन अन्सारी याला सौदी अरेबियातून उचलले होते. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी फारुक टकला यालाही दुबईतून झटपट उचलण्यात आले. राणाचा प्रकरण म्हणजे त्याला फरार घोषित करण्यात आपल्याकडून झालेला उशीर. हे मात्र निश्चित, २६/११ च्या हल्ल्याचे लोकल कनेक्शन जे जुंदाल सांगू शकला नाही, ते तहव्वूर राणा सांगू शकतो.