बारसुमध्ये रिफायनरी प्रकल्पासाठी जागा देतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिले जानेवारीत, त्याबाबत माहिती उघड झाली. पण काही लोकांना ही माहिती मिळाली त्यांनी मोठ्या संख्येने इथे कवडीमोल दराने जमिनी विकत घेतल्या. इथे प्रकल्प येणार हे माहीत असते तर स्थानिक लोकांनी कमी दराने जमिनी फुंकल्या नसत्या. कोकणातल्या लोकांची ही फसवणूक कोणी केली, त्याची जबाबदारी कोणाची?