जमियत उलेमा ए हिंद या संघटनेचे दिल्लीत अधिवेशन झाले. या अधिवेशनात सुर्य नमस्कार, सरस्वती वंदना आदी प्रथांचा मुस्लीम विद्यार्थ्यांनी विरोध करावा असा फतवा जारी करण्यात आला. जमियतचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांनी अलिकडेच २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचा झालेला पराभव हा मुस्लीम मतांमुळे झाल्याचा दावा केला होता. मदनी यांचे विधान आणि जमियतने काढलेल्या फतव्याचा अर्थ एवढाच आहे, की केंद्रातील भाजपा सरकारने गेली दहा वर्ष राबवलेले सबका साथ सबका विकास हे धोरण पालथ्या घड्यावर पाणी ठरले आहे, मुस्लीम कट्टरतावाद्यांवर त्याचा शून्य परीणाम झालेला आहे.