२५ नोव्हेंबरपासून न्यूझीलंड विरुद्ध पहिला टेस्ट सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा अजिंक्य रहाणेकडे असणार आहे. कसोटी क्रिकेटचा कॅप्टन म्हणून असलेला अजिंक्य रहाणेचा आलेख उल्लेखनीय आहे. त्यामुळे आता कॅप्टन म्हणून अजिंक्य हा अजिंक्यच राहणार का? याकडेही भारतीय चाहत्यांचे लक्ष असणार आहे. तसेच राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाची कारकीर्द कशी असणार आहे याकडेही लक्ष असणार आहे.