समुद्र किनारी वस्ती करणाऱ्या कोळी-आगरी समाजाच्या जमीनी लाटायच्या आणि इथे बंगले, स्टुडीयो ठोकायचे, हे धंदे बराच काळ सुरू आहेत. कोविडच्या काळात हा धंदा बरकतीला आला होता. कारण मंत्रीच या धंद्यात उतरले होते. अशी एक-दोन नाहीत तर तीनशेच्या वर बांधकामे मढ- एरंगळमध्ये उभी राहीली आहेत. ती तीन महीन्यात तोडू असे आश्वासन विधानसभेत देण्यात आले आहे. परंतु हे प्रत्यक्षात येईल याची शक्यता कमीच. कारण यापूर्वीही अशी आश्वासने याच विधानसभेत देण्यात आली होती. जिथे पैशाचे वजन आहे. तिथे कारवाई तर फार दूरची बाब, दुनिया वाकून कुर्निसात करते असा अनुभव आहे.