मराठा आंदोलना दरम्यान जाती जातीत तेढ वाढवणारे जे अनुचित प्रकार झाले, त्याची पुनरावृत्ती ओबीसीने टाळण्याची गरज आहे. आरक्षणासाठी किंवा कोणत्याही मागणीसाठी कायद्याच्या चौकटीत आंदोलन करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी ही चौकट मोडण्याचा प्रयत्न केला. ओबीसी नेत्यांना गावबंदी जाहीर केली. हा प्रकार घटनेने दिलेल्या अधिकारांचे उल्लंघन करणारा होता. ओबीसी समाजाने आंदोलन करताना या चुकीची पुनरावृत्ती करण्याची गरज नाही. हे आंदोलन मनोज जरांगे यांच्या मार्गाने जाऊ नये, याची काळजी घेतली पाहीजे.