राहुल गांधी सध्या अमेरीकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे विदेश दौरे कायम चर्चेत असतात. हा जगातील बहुधा एकमेव नेता आहे, जो परदेशात जाऊन स्वत:च्या देशाची बदनामी करतो आणि शत्रू राष्ट्राची प्रशंसा करतो. २०२३ मध्ये झालेला ब्रिटन दौरा आणि सध्या सुरू असलेला अमेरीका दौरा यात राहुल गांधी यांनी ते सातत्य राखले आहे. रा.स्व.संघावर टीका, चीनची भलामण, या नेहमीच्या मुद्द्यांसोबत यावेळी जातीगत जनगणनेच्या मुद्द्याची भर पडली आहे. चीनच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेबाबत, तिथून बाहेर पडणाऱ्या कंपन्यांबाबत, वाढत्या बेरोजगारी बाबत जगातील देश, वित्त मानांकन संस्था उच्चारवाने बोलत असताना राहुल गांधी चीनमध्ये बेरोजगारीची समस्या कशी नाही, हे सांगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते हास्यास्पद ठरतात. विदेशात गेलेले राहुल गांधी चीनचे ब्रँडींग करतात, तेव्हा या चीनधार्जिणेपणाचे कोडे अनेकांना सुटत नाही.