माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी नागपूरमधील भेटीदरम्यान देशात लोकशाही दिसत नाही, सगळीकडे हुकुमशाही आहे, असे विधान केले. एरवी प्रतिस्पर्धी पक्षांवर टीका करणे ठीक आहे पण देशात लोकशाहीच नाही असे एका उदयोन्मुख नेत्याने म्हणणे हे हास्यास्पद ठरते, त्याच्या कुवतीवर शंका घेणारे ठरते.