पर्यावरण रक्षणाची चर्चा आपत्ती नंतरच का?

Why Discussions Happen Only After Disaster?| पर्यावरण रक्षणाची चर्चा आपत्ती नंतरच का?

दिनांक ७ फेब्रुवारी २०२१ रोजी उत्तराखंड मध्ये महाप्रलय आला. एक हिमकडा नदीत कोसळल्याने नदीला महापूर आला. रौद्र रूप धारण केलेली नदी धोकादायक बनली. त्यानंतर या महापुराच्या अनुषंगाने पर्यावरणप्रेम, पर्यावरणीय बदल, जागतिक तापमानवाढ अशा सगळ्या विषयांना वाहिलेले विविध लेख वर्तमानपत्रात लिहीले जातील. परंतु यात प्रश्न निर्माण होतो की, केवळ प्रश्न उपस्थित केल्याने नागरिकांचा पर्यावरण वाचवण्यात मोहिमेत समावेश कसा होऊ शकेल? शहरीकरण, औद्योगिकीकरण यांना दोष देऊन प्रश्न सुटणार नाही.

शहरीकरण हा मानवीवस्तीचाच एक प्रकार आहे. त्यामुळे केवळ त्याला दोष देऊन भागणार नाही. मग नेमकी कशाची आवश्यकता आहे? मोठ्या आकाराच्या आपल्या अर्थव्यवस्थेची गाडी चालण्यासाठी औद्योगिक क्षेत्राशिवाय कोणते पर्याय उपलब्ध असू शकतात, त्याबद्दलही विचार व्हायला हवा. त्याशिवाय शहराला आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांबाबत पर्यावरणप्रेमींच्या भूमिका का आवश्यक असतात?

शहरात राहणाऱ्या सामान्य नागरिकांनी त्यांच्या आयुष्यात कोणते बदल केले तर काही प्रमाणात पर्यावरणप्रेमी जीवनशैली अवलंबली जाईल त्याबद्दलही मार्गदर्शन झाले पाहिजे. पर्यावरण लोकाभिमुख करण्याची गरज आहे. त्याने काय होईल? ही गरज का निर्माण झाली आहे? इत्यादी काही प्रश्नांची चर्चा करण्याचा प्रयत्न या व्हिडियोतून करण्यात आला आहे.

Exit mobile version