जे दहशतवादी हे तिथं आलेले होते आणि त्यांनी जो हल्ला केला तो सकाळी हल्ला करायचं ठरवलं आणि दुपारी हल्ला केला असं अजिबात नाही. साधारणपणे अशा पद्धतीचा हल्ला जेव्हा करण्यात येतो तेव्हा त्या हल्ल्याच्या आधी कितीतरी दिवस या सगळ्या हल्ल्याबद्दल प्रचंड प्रमाणात बारकाईनं नियोजन केलं जातं. हल्ला कुठे करायचा आहे, त्या परिसराची रेकी केली जाते. त्या परिसरात कुठून जायचं, त्याच्या वाटा कुठल्या आहेत, हल्ला केल्यानंतर तिथून कसं निघून जायचं आणि कुठे जायचं याचं पूर्ण वेळापत्रक वेळेनुसार हे केलं जातं. याचा अर्थ स्पष्ट आहे की हे जे दहशतवादी हल्लेखोर पहलगाम या ठिकाणी येऊन त्यांनी हल्ला केला ते आधीच काश्मीर खोऱ्यात येऊन दाखल झालेले होते.