मुस्लीम मतदार काही प्रमाणात भाजपाच्या बाजूने वळतो आहे, असे चित्र दिसत असल्यामुळे चवताळलेल्या काँग्रेससारख्या तथाकथित सेक्युलर पक्षांनी थेट औंरगजेबासमोर गुढगे टेकायला सुरूवात केली आहे. तुष्टीकरणासाठी कमरेत कोण अधिक वाकतो याची स्पर्धा लागली आहे. जो तुमको हो पसंद वही बात करेंगे… ही या पक्षांची भूमिका आहे. अशा परीस्थितीत मुस्लीम मतदार कोणाची बाजू घेणार? ट्रीपल तलाक हा कुराणाचा आदेश म्हणणाऱ्या शरद पवारांसारख्या नेत्याला टाळी देणार, की ट्रीपल तलाक गुंडाळणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना? हा कळीचा मुद्दा आहे.