दह्शद काय असते ते आपण अनेकदा चित्रपट, वाहिन्यांवरील मालिकांमधून पाहिलेले आहे. पण या पडद्यावरील दहशदिला लाजवेल असा प्रकार सध्या पश्चिम बंगालमध्ये सुरु आहे. आपल्याला मी अस म्हटल्यानंतर आश्चर्य वाटेल पण हि वस्तुस्थिती आहे. पश्चिम बंगाल मध्ये अशीच अवस्था सध्या आहे. कारण लोकसभा निवडणुका झाल्यानंतर तिथे राजकीय हत्या होण्याचा प्रकार सुरूच आहे. कसलेही नियंत्रण तिथे राज्य सरकारचे नाही अशी अवस्था ममता सरकारची आहे. सामन्य लोकांचे एकीकडे बळी जात असताना ममता सरकार मात्र याकडे सोयीस्करपणे कानाडोळा करत आहे.