लंडनमध्ये गेल्या वर्षी एक गोपनिय बैठक झाली. भारतातील विरोधी पक्षातील काही नेते, बँकर, अनिवासी भारतीय, विदेशी दूतावासातील काही लोक या बैठकीत सहभागी झाले होते. याच बैठकीत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अस्थिर करण्याबाबत खल झाला. गौतम अदाणी यांच्या उद्योग समुहाला दणका देण्यासाठी हिंडेंनबर्ग शॉर्ट सेलिंग एण्ड रिसर्च फर्मला सुपारी देण्याचा निर्णय ही याच बैठकीत झाला.