महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार नाहीत असे, सांगून जेष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांचा पत्ता कापला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची अजिबात लालसा नव्हती, परंतु नाईलाजाने पदावर विराजमान व्हावं लागलं. ही थिअरी ठाकरे गटाच्या नेत्यांनी अनेकदा मांडली. तेच राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना दिसतायत. त्यामुळे शरद पवार खोटं बोलले होते का? असा सवाल निर्माण झालेला आहे.