प्रशांत किशोर यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची घेतलेली ताजी भेट नक्कीच हवापाण्याच्या गप्पा मारण्यासाठी नव्हती. नितीशना मोदींच्या गोटातून फोडून विरोधकांच्या कळपात आणण्यासाठी या भेटीत खल झाला अशी चर्चा आहे. प्रशांत किशोर मोदी विरोधकांच्या मेसेंजरच्या भूमिकेत शिरले आहेत.