जनतेची स्मरण शक्ती खूपच कमजोर असते असे म्हणतात. काही भाजपा नेत्यांचे तर कार्यकर्त्यांच्या स्मरण शक्तीबाबतही तसेच मत दिसते. फार दूर नाही, काल परवाच्या जाहीर सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सूड ssss सूड, अशी गर्जना केली. भाजपाबद्दल, भाजपाच्या वरीष्ठ नेतृत्वाबद्दल असलेली जळजळ मळमळ ठाकरेंनी कधी लपवून ठेवलेली नाही. तरीही भाजपामध्ये नगण्य संख्येने असलेला एक गट त्यांच्याशी यूती करण्यासाठी डोळे लावून बसलेला असतो. एका खूप मोठ्या नेत्याला तर उबाठा शिवसेनेच्या नावाने कायम उचक्या लागलेल्या असतात