लोअर परळ येथील पुलाचे काम २०१८पासून रखडले आहे. या अपूर्णावस्थेत असलेल्या कामामुळे सर्वसामान्यांच्या हालाला पारावार राहिलेला नाही. संथगतीने सुरू असलेले हे काम नेमके कधी पूर्ण होणार आहे, असा सवाल लोक विचारत आहेत.