सध्या राष्ट्रीय राजकारणात शरद पवार हे केंद्रस्थानी आहेत ते त्यांच्या काही भूमिकांमुळे. जेपीसीची मागणी, अदानींबद्दलची त्यांची भूमिका यामुळे विरोधकांना धक्का बसला आहे. त्यामुळे शरद पवार भाजपाच्या जवळ जात आहेत असे म्हटले जात आहे. पण तसे होईल का ही विरोधकांमध्ये राहून ते आपली ताकद दाखवत भाजपाला फायदा करून देतील?