१८ सप्टेंबरला काय होणार? धक्कातंत्राचा विरोधकांना धसका

१८ सप्टेंबरला काय होणार? धक्कातंत्राचा विरोधकांना धसका | Dinesh Kanji | India | Bharat | Narendra M

देशाचे नाव बदलण्यासाठी ऐन गणेशोत्सवाच्या काळात संसदेच्या विशेष अधिवेशनाचा घाट घालण्यात आला असल्याच्या चर्चा केवळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय माहीती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले आहे. १८ ते २२ सप्टेंबर या काळात विशेष अधिवेशन होणार असे जाहीर केल्यानंतर राजकीय पक्षांत प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धक्कातंत्राचा विरोधकांना चांगलाच अनुभव आहे. विरोधकांनी या धक्कातंत्राचे धक्के अनेकदा झेललेले आहेत. त्यामुळे विशेष अधिवेशनात नवा धक्का कोणता? याचा तर्क बांधण्याचा नवा उद्योग मोदींनी विरोधकांना दिलेला आहे.

Exit mobile version