नरेंद्र दाभोलकर यांची हत्या २०१३ला झाली. त्यानंतर १० मे रोजी त्यासंदर्भातील निकाल लागण्याची शक्यता आहे. या इतक्या वर्षात वेगवेगळ्या प्रकारे तपास झालेला आहे, साक्षीपुरावे गोळा झालेले आहेत. त्यात अनेक त्रुटी, घोळ असल्याचेही समोर आलेले आहे. हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग असल्याचे दावे करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात या निकालात कोणते सत्य समोर येणार हे पाहायचे आहे.