गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये झालेल्या निधी वाटपाची आकडेवारी पुढे आली आहे. यामध्ये सर्वाधिक निधी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आला असून दुसऱ्या क्रमांकाला काँग्रेस पक्ष आहे. तर सर्वाधिक आमदार आणि मुख्यमंत्री पद असलेल्या शिवसेनेच्या वाट्याला सर्वात कमी निधी आला आहे. सत्ता स्थापनेच्या वेळी मुख्यमंत्रीपदासाठी हटून बसलेले उद्धव ठाकरे यांनी ती खुर्ची तर मिळवली. पण त्याची नेमकी काय किंमत त्यांना आणि त्यांच्या पक्षाला मोजावी लागत आहे? हा सौदा फायद्याचा ठरला की घाट्याचा? याचा विचार करण्याची गरज आहे.