वाद आणि आव्हाड हे एक समीकरणच बनले आहे. आपल्याला इतिहासाचे सगळे ज्ञान आहे हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न आव्हाड नियमितपणे करत असतात. विशेष करून त्यांना मुघली इतिहासाबद्दल अधिक आपुलकी आहे. मात्र हिंदू, ब्राह्मण, हिंदू देवीदेवता याबाबतीत त्यांच्या टिप्पण्या हेटाळणी करणाऱ्या असतात. परंतु त्याबद्दल त्यांनी कधी ना खेद व्यक्त केला ना कधी माफी मागितली. उलट आपण हे कसे सत्यच बोललो त्याचे वेगवेगळे दाखले देताना ते दिसतात. छत्रपती शिवरायांचा अपमान झाला की त्यावर ज्ञानामृत पाजणे हा त्यांच्या आवडीचा विषय असतो. आता मात्र जितेंद्र आव्हाड यांनी एका प्रकरणात चक्क माफी मागितली आहे. हो जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली आहे. पण यावेळी त्यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या टिप्पणीवरून लोटांगण घातले आहे. थेट मुस्लिम समाजाचीच त्यांनी माफी मागितली आहे.