आपल्या आयुष्यात विविध प्रकारच्या अडचणींना तोंड द्यायला लागते. विशेषतः २०२० हे वर्ष आपणा सर्वांसाठी कोविड-१९ महामारीमुळे अधिक खडतर ठरले आहे. आता कोविड-१९च्या महामारीतून उभे राहणाऱ्या आपणा सर्वांसाठी अतुल महाजन गुरूजी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत.
येणाऱ्या १० आणि ११ साली दुर्मिळ असा विशेष योग जुळून आला आहे. येत्या ११ तारखेला ७ ग्रहांची महायुती होणार आहे. हे सात ग्रह म्हणजे सूर्य, चंद्र, बुध, गुरु, शुक्र, प्लुटो आणि शनी. हे सातही ग्रह मकर राशीत एकत्र येणार आहेत. हे सातही ग्रह एकत्रितपणे मकर राशीत एकत्र येण्याचा योग ६० वर्षांनी आलेला आहे. त्याच दिवशी पौष महिन्यातील अमावस्या आहे.
या सर्व परिस्थितीचे चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम या जगाला भोगायला लागणार आहेत. तर ते परिणाम नेमके कोणते आणि कशा प्रकारचे असतील यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न अतुल महाजन गुरुजींनी केला आहे. या सोबतच शनीची साडेसाती म्हणजे काय? त्याचे नेमके काय परिणाम होतात? शनीची साडेसाती अशुभ मानली जाते पण ती खरंच तशी असते का? अशा अनेक गोष्टींवर भाष्य करण्यात आले आहे.