विधीमंडळ अधिवेशन काळात विरोधकांकडे विविध मुद्दे उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करण्याची संधी असते. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांनी त्याची चुणूक वारंवार दाखवली. आता उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनादरम्यान बॉम्बस्फोट करण्याचे सुतोवाच केले आहे. परंतु त्यांना कोणी गंभीरपणे घेताना दिसत नाही. सत्ताधारी बाकांवर निश्चिंतता आहे. उद्धव यांच्या दाव्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी आमच्याकडे बॉम्ब आहेत, ते योग्यवेळी बाहेर काढू असा दावा केला आहे. याचा अर्थ लक्षात घेण्याची गरज आहे.