लोकसभा निवडणुकांचा अखेरचा टप्पा शिल्लक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाच्या विजयासाठी रक्त आटवतायत. मोदी-०.३ साठी पुढच्या शंभर-सव्वाशे दिवसांचा रोड-मॅप त्यांनी जाहीर केला आहे. त्यावर काम सुरू झालेले आहे. प्रचाराच्या दरम्यान त्यांच्या याच रोड-मॅपबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठकाही सुरू आहेत. प्रचारामुळे प्रचंड शिणलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र लंडनच्या गारव्यात विश्रांती घ्यायला गेलेले आहेत. सोबत वाचाळ शिरोमणी संजय राऊतही रवाना झालेले आहेत. सध्या राजकीय घडामोडी पाहाता ठाकरेंचा हा दौरा फक्त विश्रांती घेण्यासाठी आहे, यावर विश्वास बसत नाही.