या व्हिडिओमध्ये पश्चिम बंगालमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीबद्दल माहिती दिली आहे.
२०१६ च्या विधानसभा निवडणुकीत डावे पक्ष आणि काँग्रेस पक्षाने युती करून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत डाव्या पक्षांनी आपला मताधार गमावला आणि काँग्रेस पक्षाला अपेक्षेपेक्षा जास्त यश आले. डाव्या पक्षांना ३२ जागा तर काँग्रेस पक्षाला ४४ जागा मिळाल्या. मात्र मतांच्या टक्केवारीत डाव्या पक्षांना २५% तर काँग्रेस पक्षाला १२.५% मतं मिळाली. अर्ध्याहून कमी मते मिळवूनसुद्धा काँग्रेस पक्षाला जास्त जागा मिळाल्या आहेत. अशा परिस्थितीसुद्धा डाव्यांनी पुन्हा एकदा २०२१ च्या निवडणुकीसाठी काँग्रेसशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यानच्या काळात भाजपा पश्चिम बंगालमध्ये तूल्यबल पक्ष झाला आहे. २०१९ च्या लोक सभा निवडणुकीत भाजपाने ४२ पैकी १८ जागा मिळवल्या होत्या आणि ४०% मतं मिळवली होती. ममता बॅनर्जींच्या तृणमूल पेक्षा भाजपाला केवळ ३% कमी मते मिळवली होती. त्याच निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ दोन तर डाव्या पक्षांना शून्य जागा मिळाल्या होत्या. तर मतांच्या टक्केवारीत काँग्रेस पक्षाला ५% आणि डाव्या पक्षांना ७% मतं मिळाली होती.
त्यामुळे आता ही युती राज्यात किती परिणामकारक ठरेल हा महत्वाचा प्रश्न आहे.