पावसाळ्यामुळे वज्रमुठ सभा स्थगित केल्याचा दावा मविआच्या नेत्यांनी केला होता. परंतु निर्धार सभांना मात्र पाऊस बाधा नसावी. त्या व्यवस्थित सुरू आहेत. हिंगोलीतील निर्धार सभेत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे नावही घेतले नाही. मविआचा उल्लेख टाळून ते सारखे I.N.D.I.A. चे नाव घेत होते. ज्येष्ठ नेते शरद पवारांनी यांच्याकडून झालेल्या भ्रमनिरासचे उट्टे बहुधा ते मविआवर काढतायत.