१९९६ चा क्रिकेट विश्वचषक. ‘भारत आणि पाकिस्तान नॉक-आउट सामना’. बेंगळुरू मधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ३५,००० लोकांची गर्दी पण सर्वत्र शांतता. कारण भारताकडून वेंकटेश प्रसाद, जवागल श्रीनाथ, अनिल कुंबळे सारखे गोलंदाज खेळत असूनही आमीर सोहेल आणि सईद अन्वर यांची आक्रमक फटकेबाजी. त्यांच्या फलंदाजीमुळे २८७ धावांचे लक्ष देखील कमी वाटायला लागले होते आणि त्यात आमीर सोहेल याने वेंकटेश प्रसाद यांना चौकार लगावला आणि परत तिथेच चौकार मारेन असे स्लेजिंग केलं आणि वेंकटेश प्रसाद यांच्या त्याच ओव्हरच्या अगदी पुढच्याच चेंडूवर आमीर सोहेल ‘क्लीन बोल्ड’. याच वेंकटेश प्रसाद यांनी अनेक सामन्यांमधून भारतासाठी, भारतीय क्रिकेट संघाला जिकविण्यासाठी मोठी कामगिरी केली आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत सांगण्यासारखे अनेक प्रसंग त्यांच्याकडे आहेत आणि त्याच आठवणींना वेंकटेश प्रसाद यांनी न्युज डंकाला दिलेल्या मुलाखतीमधून उजाळा दिला आहे