२ मे २०२१ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आंदमानातून झालेल्या मुक्ततेला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमीत्ताने सावरकर अभ्यासक, लेखिका, निवेदिका आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांची ‘न्यूज डंका’ ने विशेष मुलाखत घेतली
या मुलाखतीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या माफीचा मुद्दा हा केवळ राजकीय मुद्दा असल्याचे परखड मत मंजिरी मराठेंनी मांडले. सावरकरांनी जे एमनेस्टी पिटिशन लिहिले त्यात मला किंवा माझ्या भावाला सोडा असे म्हटले नाहीये. ते पिटिशन जनरल स्वरूपाचे होते. इतर कैद्यांना सोडा अशी मागणी त्यांनी केली. त्यात कुठेही आपल्या कृतीची खंत किंवा खेद त्यांना नव्हता.
सावरकरांच्या अंदमानातील वास्तव्याबद्दलही त्यांनी भाष्य केले. अंदमानात असताना सावरकरांनी तिथल्या कैद्यांची शुद्धिक्रिया केली. हिंदू कैद्यांना त्रास द्यायला मुद्दाम मुस्लिम अधिकारी ठेवले जात. हिंदूंच्या अन्नाला स्पर्श करून तिथल्या हिंदूंमध्ये बाटले गेल्याची भावना निर्माण करायची आणि मग त्यांचे धर्मांतर करायचे हे नित्याचेच होते. पण सावरकरांनी “त्यांच्या स्पर्श करण्याने अन्न मुसलमान होत असले तर तुमच्या स्पर्शाने ते हिंदू झाले पाहिजे” अशी भूमिका घेत तिथल्या धर्मांतराला आळा घातला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सोबतच त्यांचे मोठे बंधू गणेश उर्फ बाबाराव सावरकर यांनाही काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. त्यांचेही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या इतकेच हाल करण्यात आले. त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला. असे मंजिरी मराठे यांनी सांगितले.
२ मे १९२१ रोजी जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांची अंदमानहून सुटका झाली तेव्हा लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता. पार्टीच्या वाटेवर अनेक ठिकाणी तात्यारावांचे मोठ्या जल्लोषात सवग होत होते. पुढे रत्नागिरीला स्थानबद्धतेत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांना राजकारणात भाग घेण्यास बंदी होती. पण त्यांनी समाजकारण करत सामाजिक क्रांती केली. यामुळेच ते केवळ स्वातंत्र्यवीर नाही तर समाजक्रांतिवीरही ठरले.
मंजिरीताईंची मुलाखत ऐकली. फार छान बोलल्या त्या.
स्वा.सावरकरांबद्दल आदर अधिकच दुणावला. बाबाराव सावरकर यांचा छळ, त्यांच्या पत्नीची शोकांतिका खरोखरच मन हेलावणारी आहे. तसेच त्या काळी कैद्यांकडून जी काही याचिका सादर केली जायची तिलाच ब्रिटिश सरकारने मर्सी पीटीशन असं नाव दिलं होतं आणि त्याचाच फायदा घेऊन आजच्या घडीला काही राजकारणी, समाजकंटक तरूणाईची दिशाभूल करतायत हे ही पुन्हा एकदा पक्क समजलं