कोणती दिशा शुभ? कोणती अशुभ?

Atul Mahajan 05 Feb EP 02 Vastu Shastra

आपल्या आयुष्यात विविध प्रकारच्या अडचणींना तोंड द्यायला लागते. विशेषतः २०२० हे वर्ष आपणा सर्वांसाठी कोविड-१९ महामारीमुळे अधिक खडतर ठरले आहे. आता कोविड-१९च्या महामारीतून उभे राहणाऱ्या आपणा सर्वांसाठी अतुल महाजन गुरूजी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत.

ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र हे दोन्ही विषय अनेकदा सोबतच जातात. वास्तुशास्त्र हे देखील ज्योतिषशास्त्रा इतकेच महत्वाचे असते. आपण राहतो, काम करतो, त्या सर्व वास्तूंचे काही नियम असतात. माणसाच्या आयुष्यात एकूणच दिशेला फार महत्व असते आणि वास्तुशास्त्राही त्याला अपवाद नाही. कोणती दिशा शुभ? कोणती दिशा अशुभ? कोणत्या दिशेला नेमके काय असावे? कोणत्या दिशेला काय असू नये? हे प्रश्न सगळ्यांनाच पडतात पण उत्तरे अनेकदा मिळत नाहीत. अतुल महाजन गुरुजींनी याच प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न ‘न्युज डंका’ च्या प्रेक्षकांसाठी केला आहे.

दक्षिण दिशेला अशुभ का मानतात? ती खरंच अशुभ असते का? उत्तर दिशेला नेमके काय असावे? ती लाभदायक असते का? ईशान्य दिशेचे नेमके काय महत्व असते? वास्तुदोष म्हणजे नेमके काय? त्यावर काय उपाय काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे महाजन गुरुजींनी दिली आहेत.

Exit mobile version