….आणि अमित शाह गहिवरले!

….आणि अमित शाह गहिवरले!

ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे यांनी न्युज डंकाला दिलखुलास मुलाखत दिली आहे. एका छोट्याशा गावातील सामान्य कुटूंबात जन्मलेला मुलगा ते एका महत्वाच्या राष्ट्रीय संस्थेचा अध्यक्ष हा कठीण पण तितकाच प्रेरणादायी प्रवास त्यांनी उलगडला. स्वकष्टाने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करणाऱ्या उत्तमरावांच्या आयुष्यातील अनेक महत्वाच्या घडामोडी या निमित्ताने उलगडल्या.

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह अंदमानात आल्यावर त्यांच्या नक्की काय भावना होत्या? त्यांना गहिवरून का आले? अशा निरनिराळ्या अनुभवांबद्दल त्यांनी या मुलाखतीद्वारे सांगितले आहे. ललित कला अकादमीचे अध्यक्ष पद स्विकारल्यानंतर त्यांनी कसा त्याचा कायापालट केला? ललित कला अकादमी ‘हॅक’ झाली होती म्हणजे नेमकं काय? विस्मृतीत गेलेल्या क्रांतिकारकांचा सन्मान करण्यासाठी त्यांची आगामी योजना कोणती? या सर्व प्रश्नांवर उत्तम पाचारणे यांनी मोकळेपणे भाष्य केले आहे.

पराग नेरूरकर यांनी ‘न्युज डंका’ साठी उत्तम पाचारणे यांची मुलाखत घेतली असुन या मुलाखतीचा हा चौथा आणि शेवटचा भाग आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. या मुलाखतीचे पहिले तीन भाग आपण न्युज डंकाच्या वेब साईटवर आणि यु ट्युब चैनल वर बघू शकता.

Exit mobile version