सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने १६ आमदारांच्या अपात्रेबाबत बहुप्रतिक्षित निकाल दिला. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला कोणताही धोका नाही हे या निर्णयाने पुरेसे स्पष्ट केले. एका बाजूला शिवसेना-भाजपाला दिलासा देणाऱ्या या निकालाने उद्धव ठाकरे यांच्या हाती मात्र खुळखुळा आला आहे. हा खुळखुळा ते पुढे काही महीने वाजवत राहातील. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या इतिहासातील पळपूटे मुख्यमंत्री आहेत, यावर या निर्णयाने शिक्कामोर्तब केले आहे.