महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुलाखतीत महाविकास आघाडी सरकारच्या काळातील अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे कसे जाळ्यात सापडले याचा उल्लेख केला. त्यांना अडकविणारा शकुनीमामा होता, असे आमदार त्यांच्याकडे येऊन सांगत असत, असेही ते म्हणाले. तो शकुनीमामा कोण याचे मात्र कुतुहल आहे.