सामाजिक बांधिलकी जपणारा ‘ प्रेमग्रंथ ‘

सामाजिक बांधिलकी जपणारा ' प्रेमग्रंथ '

आर. के. स्टुडिओ म्हंटलं की आपल्याला आठवतं ते म्हणजे भव्यदिव्य सेट, आकर्षक कथानक, मोठी स्टारकास्ट आणि सुपरहिट फिल्मचा शिक्का. पण आर. के चे सगळेच चित्रपट काही सुपरहिट झाले नाहीत, जोकर चे उदाहरण आपल्याला माहिती आहेच पण अजून एक असा चित्रपट ज्यामध्ये ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित असे दोघे त्याकाळातले स्टार्स होते पण तरी तो चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नाही. तो चित्रपट म्हणजे ‘प्रेमग्रंथ’. आर. के. फिल्मचा चित्रपट ‘प्रेम ग्रंथ ‘ ला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने माधुरी दीक्षितने ट्वीट केले ही एक मोठी गोष्टच. राजीव कपूर दिग्दर्शित या चित्रपटात माधुरी दीक्षितच्या नृत्याला भरपूर वाव मिळाला आणि तिने आपली ही नृत्ये एन्जाॅयही केली. त्यावेळच्या सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारा हा चित्रपट होता म्हणून हा चित्रपट हिट ठरला नाही असेही म्हंटलं जाते. याच चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रेमग्रंथ वर टाकलेला फोकस.

Exit mobile version