वारी…वारकरी ही महाराष्ट्राला लाभलेली अलौकिक परंपरा. केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात या वारीच कुतूहल असत. मनी विठ्ठलाचा भाव, ज्ञानोबा, तुकोबांचा गजर करत चालत हजारो वारकरी पंढरीला जात असतात. मात्र अलीकडे समाजातील काही घटक या वारीत जाऊन आपला वेगळा अजेंडा राबवण्याचा उद्योग सध्या सुरु आहे. या प्रकार हाणून पाडण्याची गरज आहे. त्यासाठी वारकरीच नाही तर समाजाने सजग होण्याची गरज आहे.