नागपूरमध्ये काल दंगल झाली. जे घडले त्यात फारसे काही आश्चर्यकारक नाही. दंगली घडवण्याच्या दृष्टीने गेला बराच काळ देशात वातावरण निर्मिती सुरू आहे. महाराष्ट्रातही तयारी सुरू होती. वक्फ सुधारणा विधेयकावरून मुस्लीमांचे धार्मिक नेते चिथावणीखोर विधाने करून माथी भडकवण्याचे काम करतायत. माथी पेटलेली आहेत हे होळीच्या दिवशी रत्नागिरी, अलिबागमध्ये निर्माण झालेला तणावावरून स्पष्ट झाले. नागपुरात फक्त औंरंगजेब फॅक्टरची भर पडली. शिवजयंतीच्या दिवशी विहिंपचे आंदोलन औरंगजेबाची प्रतिकात्म कबर जाळण्याचे आंदोलन झाले नसते तरी दुसऱ्या एखाद्या मुद्द्यावरून ही दंगल झालीच असती. दारुगोळा तयार होता, त्यांना फक्त ठिणगी हवी होती