ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे यांनी न्युज डंकाला दिलखुलास मुलाखत दिली आहे. एका छोट्याशा गावातील सामान्य कुटूंबात जन्मलेला मुलगा ते एका महत्वाच्या राष्ट्रीय संस्थेचा अध्यक्ष हा कठीण पण तितकाच प्रेरणादायी प्रवास त्यांनी उलगडला. स्वकष्टाने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करणाऱ्या उत्तमरावांच्या आयुष्यातील अनेक महत्वाच्या घडामोडी या निमित्ताने उलगडल्या.
शिल्पकार होण्यासाठी कष्ट सगळ्यात महत्वाचे असतात आणि त्यासाठी महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून कशाप्रकारे तयारी करून घेतली जाते? चित्रकलेच्या तुलनेत शिल्पकला उपेक्षित का राहते? वेगवगळ्या प्रकारच्या साधनांपासून शिल्पे बनवताना काय आव्हाने असतात? कोणते शिल्पकार उत्तम पाचारणे यांचे आदर्श आहेत? अशा अनेक प्रश्नांवर उत्तमजींनी मोकळेपणे उत्तरे दिली आहेत.
उत्तम पाचारणे यांचे जेष्ठ चित्रकार वासुदेव कामात यांच्यासोबत मैत्रीचे धागे कसे विणले गेले याचा किस्सा सांगताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत उत्तमजींचे नाते कसे जुळले याचाही त्यांनी उलगडा केला. पराग नेरूरकर यांनी ‘न्युज डंका’ साठी उत्तम पाचारणे यांची मुलाखत घेतली असुन या मुलाखतीचा तिसरा भाग आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. या मुलाखतीचे दोन भाग आपण न्युज डंकाच्या वेब साईटवर आणि यु ट्युब चैनल वर बघू शकता.