वक्फ बोर्डाच्या आडून काँग्रेस नेत्यांनी महाराष्ट्रातील प्रचंड जमीन लाटली असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीसांचे हे आऱोप म्हणजे हवेतला गोळीबार नाही. याची मूळं काँग्रेसच्या सत्ताकाळात वक्फ बोर्डाच्या जमीनीचा हिशोब लावण्यासाठी स्थापन केलेल्या समितीच्या अहवालात आहे. २०१५ मध्ये हा अहवाल आला होता. गेली अनेक वर्षे गुलदस्त्यात असलेला अहवाल आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसाठी डोक्याचा ताप बनला आहे. ज्या काळात हा घोटाळा झाल्याचा आरोप फडणवीसांनी केला तो काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचा सत्ताकाळ आहे