हे विधीमंडळ नाही, चोर मंडळ आहे, अशी सडकछाप भाषा वापरणाऱे शिल्लक सेनेचे नेते संजय राऊत यांना अटक झाली नाही तर शिंदे-फडणवीस सरकारची लाज जाईल, अशी परीस्थिती आहे. कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी दोन जणांना अटक झाल्यानंतर राऊत यांची तडफड वाढली आहे. घोटाळ्यातील मुख्य पात्र असलेले राऊत यांचे मित्र सुजीत पाटकर यांना अटक झाल्यानंतर यातली राजकीय कनेक्शन उघड होणार आहे. घोटाळ्यातील खरा लाभार्थी कोण, कोविड मृतांच्या टाळूवरचे लोणा खाणारा नेता कोण हे उघड होणार आहे.