भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा ऐतिहासिक होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना नमन केले. या स्मृतिस्थळांवर जाणारे ते दुसरे पंतप्रधान आहेत. आज देशात, जगातही जो हिंदुत्वाचा विचार प्रखरपणे मांडला जात आहे, त्या अनुषंगाने ही भेट महत्त्वाची ठरते.