जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्सचे आपले एक स्वतंत्र व्यक्तीमत्व असे. ताडदेवच्या डायना थिएटरची वैशिष्ट्ये तर केवढी तरी वेगळी. सत्तरच्या दशकात तेथे स्टाॅलचे तिकीट दर पासष्ट पैसे असे होते आणि तिकीट क्रमांक नसे. येथे पूर्वी दारासिंगची भूमिका असलेले अनेक स्टंटपट रिलीज होत तसेच ते रिपीट रन चित्रपटाचे थिएटर म्हणून प्रेक्षकांना आपलेसे वाटे.